| सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते |  
 

करवीर निवासिनी श्री. महालक्ष्मी मुर्तीची शारदीय नवरात्रातील विविध रूपातील पूजा

 
 
 
 
दिवस १- आदिलक्ष्मी पूजा   दिवस २- धन धन्य लक्ष्मी पूजा   दिवस ३- धैर्य लक्ष्मी पूजा
 
 
दिवस ४- गज लक्ष्मी   दिवस ५- संतान लक्ष्मी   दिवस ६- त्र्यंबोली भेट / अंबारीतील
 
 
दिवस ७- विजय लक्ष्मी   दिवस ८- विद्या लक्ष्मी   दिवस ९- महिषासुर मर्दिनी
 
 

१३ ते २२ ऑक्टोबर २०१५ ह्या दहा दिवसाच्या नवरात्री उत्सवात कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या कपाळा वर्रील दररोज नवीन नक्षीदार कुंकू व त्याच्या १० छटा.

 
  अंबाबाई ही स्त्रीराज्यकर्ती असल्याने तिने प्रजेच्या कल्याणासाठी कृषी संस्कृतीला प्राधान्य दिले. अंकुरातून धान्याची निर्मिती म्हणजे सृजनाचा उत्सव म्हणून देवीच्या नवरात्राला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी तोफेच्या सलामीनंतर मंदिरात घटस्थापना व नंदादीपाचीही प्रतिष्ठापना होते. या विधीला 'देवी बसली' असे संबोधतात. दुपारची आरती शंखतीर्थ झाल्यानंतर 'श्रीं'ची रत्नजडित दागिने व भरजरी उंची शालू यांनी अलंकार पूजा बांधली जाते. नवरात्रात देवीची रोज खडी पूजा, बैठी पूजा, अश्‍वारूढ पूजा, रथारूढ पूजा, मयूरारूढ, महिषासूर र्मदिनी, अंबारीतील सिंहवाहिनी, गायत्री अशा अनेकविध रूपांत देवीची पूजा बांधली जाते. नऊ दिवसांत रोज रात्री साडेनऊ वाजता देवीच्या उत्सवमूर्तीची पालखी काढली जाते.
ललिता पंचमी सोहळा
आश्‍विन शुद्ध पंचमीला त्र्यंबोली यात्रा भरते. अंबाबाई मंदिरापासून तीन मैलाच्या अंतरावर टेंबलाईचे भव्य मंदिर आहे. ही देवी अंबाबाईवर रूसून तिच्याकडे पाठ फिरवून बसली आहे. त्यामुळे अंबाबाई आपल्या लव्याजम्यासह तिच्या भेटीला जाते, ही त्यामागे आख्यायिका. यादिवशी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी, गुरू महाराजांची पालखी टेंबलाईला जाते. दुपारी बारा वाजता दोन्ही देवतांच्या भेटी होतानाच आरती होते. यावेळी श्रीमंत छत्रपती घराण्याच्या स्वार्‍या मंडपात येतात व कुमारिका मुलीच्या हस्ते कोहळा फोडण्याचा कार्यक्रम होतो. येथून अंबाबाईची पालखी परत निघते. नगरप्रदक्षिणा सोहळा : 'याचि देही याची डोळा'
'आश्‍विन शुद्ध अष्टमी' हा जागराचा दिवस. या दिवशी पालखी निघत नाही, तर अंबाबाई वाहनात बसून करवीरवासीयांच्या भेटीला म्हणजे नगरप्रदक्षिणेला निघते. हा सोहळा 'याचि देही याची डोळा' अनुभवावा, असा असतो. रात्री बारानंतर देवीची महाकालीसमोर जागराची पूजा सुरू होते. यावेळी कोणालाही प्रवेश दिला जात नाही. पहाटे तीनला पूजा संपते. नवमीला यज्ञविधी सप्तशती पाठ होतात. पूर्णाहूती झाल्यानंतर तोफेची सलामी होते व हा विधी संपतो. त्यानंतर तीन तासांनी देवीचा दरवाजा उघडला जातो व पूर्ववत पूजा विधी सुरू होतात. त्यानंतर 'नवरात्र उठले' असे म्हटले जाते.
 
     
 

विजया दशमी दसरा , दसरा चौक

 
 
 
     
  ललितापंचमी पालखी सोहळा (श्री.महालक्ष्मी - श्री.त्रेम्बोली देवी भेट)  
 
 
     
 
 
     
  नवरात्र उत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची विद्युत रोषनाई